मुंबई ( प्रतिनिधी ) – सामान्यांसाठी स्वस्त औषध पॅरासिटामॉलसह तब्बल 800 औषधांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीनं ही दरवाढ केली आहे. 10.7 टक्क्यांची वाढ आहे .
गेल्या वर्षीच्या तुलनेतील होलसेल प्राईज इंडेक्स आणि 2020 च्या तुलनेत ही 10.7 टक्क्यांची वाढ सामान्यांच्या खिशावर ताण टाकेल 1 एप्रिलपासून नवे दर लागू केले जाणार आहेत.
नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीनं शुक्रवारी निर्णय जाहीर केला आता फक्त तापच नव्हे, तर तापासारख्या इतरही अनेक छोट्या मोठ्या आजारांवरील औषधं महागणार आहेत.
ताप , संसर्गजन्य आजार , इनफेक्शन किंवा एलर्जी , हृदयरोग , उच्च रक्तदाब , त्वचेचे विकार , अशक्तपणा या आजारांवरील औषध महागणार आहेत
पॅरासिटेमॉल , हिनोबारबिटोन , फेनिटॉईन सोडियम , अझिथ्रोमेसिन , सिप्रोफ्लोक्सेसीन हायड्रोक्लोराईड , मेट्रोनीडाझोल, इत्यादी औषधे महागणार आहेत
पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर अखेर इंधन दरवाढीनं डोक वर काढलंय. सोन्याचे आणि चांदीचे दरही वाढू लागले आहे. वाढत्या इंधनदरवाढीचा थेट परिणाम भाज्या, फळं यांच्या दरांवर होतो आहेच. आता औषध महागण्याच्याही वृत्तानं सामान्यांना घाम फुटलाय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. एककीडे राजा आपला महाल बांधण्याची तयारी करतोय आणि दुसरीकडे प्रजा महागाईचा मार खातेय, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.