जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विद्युत पोलवरील रोहित्राला आग लागल्याची घटना शनिवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.
शहरातील बाजार समिती परिसरात एका ठिकाणी विद्युत पोलवरील रोहित्राला अचानक आग लागली. काही वेळातच आग मोठी झाली. प्रचंड आगीचे लोट बाहेर पडत असल्याने बाजार समितीतील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला दिली. त्यानुसार गोलाणी मार्केट येथील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करत आग विझवली. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, सुदैवाने कुठलीही अनुचित घटना घडली. विदेशातील बंबाला उशीर झाला असता तर आज पसरली असती. मात्र अग्निशमन बंबामुळे ती आटोक्यात आली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी वसंत न्हावी, भगवान जाधव, भरत बारी, पुंडलिक सपकाळे यांनी सहकार्य केले.