विद्यापीठाच्या कारभाराबद्दल विद्यार्थी संघटना झाल्या आक्रमक
जळगाव (प्रतिनिधी) – आदरणीय कुलगुरू साहेब सेक्यूरिटी गार्ड यांचे पगार कधी होणार ? आपल्या जळगाव मधील क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये सुरक्षा रक्षक यांचा ठेकेदार इंगल हंटर कंपनी आहे. त्यांना अजून दोन कामाच्या स्वरूपाचे ठेके दिले आहे.परंतु त्यासाठी लागणारे कर्मचारी हे आपल्या जिल्ह्यातील आहेत. त्यांना लॉक डाउन मध्ये घरी रहावे लागले त्याना पगार दिला गेला नाही, तरी ते निमूट पने गप्प बसले त्यांचे pf, बोनस esi, भत्ता, मेडिकल बिल, workman compansation ..कपडे …त्याचा धुलाई भत्ता ..नवीन बूट …नवीन ड्रेस ओवर टाइम ह्याचे ठेकेदाराने पैसे घेतले परंतु प्रत्यक्षात मात्र त्याना काय नरक यातना दिल्या जात आहेत ह्याची आपल्याला जाणीव आहे का … त्या संबंध आपण किवा आपल्या सहीच्या मंजुरीने ज्याला एक सदस्यीय समितीचा मुख्य बनला असा एक सीणेट मेंबर ह्याने तरी त्या कर्मचारी वर्गाची चौकशी केली का की, फक्त ठराव करतानाच विद्यापीठ व सिनेट सदस्य ह्यांची कायदा व विधी विभागाचा सल्ला न घेता बिल पास करण्यासाठी तेवढीच आपली गरज म्हणून ठेकेदारास बोलवले जाते व बिल निघाले की भेटले की नाही ठेकेदार सुरक्षा रक्षक याना पैसे देतो की नाही. आपण कधी चौकशी केली आहे का ?, त्या कर्मचारी वर्गाला रात्री ड्यूटी करतना काय त्रास होतो याचा आपण कधी मागोवा घेतला आहे का? व जर कोणी सुरक्षा रक्षक ह्या प्रकरणाविषयी बोलला तर त्याला कामांवरून कमी केले जाते. त्याची एण्र्टि बंद केली जाते असा अन्याय का केला जातो. मुळात आपल्या कडे गार्ड बोर्ड समितीचा कायदा लावला जात नाही. कामगार आयुक्त म्हणतात विद्यापीठ म्हणते की आमची शैक्षणिक संस्था आहे. आम्हाला हा कायदा लागू होत नाही परंतु ठराव करतना मात्र गार्ड बोर्ड समितीचा कायदा लावण्यासाठी बैठक बोलावली जाते परंतु तसे होत नाही यामागे नेमके काय आहे याचे सविस्तर वर्णन आपण जाहीर रित्या सर्वाना करावे सुरक्षा रक्षकांना होणारा त्रास त्यांची आर्थिक, मानसिक, शारीरिक, पिळवणूक थांबवून त्याना लवकरात लवकरच त्यांचे पेमेंट करून द्यावे कारण त्यांचे घर व घरातील सदस्य ह्याना कोणतेही दुसरे उत्पन्नाचे साधन नाही जरी आपण ठेकेदार ह्यास ठेका दिला असला तरी त्याच्यावर आपले नियम कायदा हे बंधनकारक आहे व तसे तो ठेकेदार वागत नसेल तर त्याला ब्लेकलिस्ट करून त्याची अनामत रक्कम जमा करून त्यास कर्मचारी वर्गाची बाकी भरण्यास भाग करून त्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे प्रसिद्धी पत्रकात खालील विद्यार्थी संघटनाचे म्हणणे आहे.
अँड कुणाल पवार (सचिव राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगाव), देवेंद्र मराठे (जिल्हा अध्यक्ष NSUI जळगाव), पियुष नरेंद्र आण्णा पाटील (सामजिक कार्यकर्ता),
भूषण भदाणे (फार्मासी स्टुडंट कौन्सिल अध्यक्ष म राज्य)