विविध उपक्रमांची सुरुवात – आ.लताताई सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

वडती ता.चोपडा (प्रतिनिधी ) – इनरव्हील क्लब ऑफ चोपडाच्या सदिच्छा भेटीत प्रांत चेअरमन श्रीमती मिनल लाठी यांच्या हस्ते विविध उपक्रम सुरू करण्यात आले. त्यात प्रामुख्याने इनरव्हील क्लब फॉरेस्ट व प्ले गार्डनचा शुभारंभ, विहीर पुनर्भरण उपक्रम, वृक्षारोपण, मिशन ममता अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना, गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत, शालेय व क्रीडा साहित्य वितरण,आदींचा समावेश आहे.
प्रारंभी क्लब अध्यक्ष सौ.शैला सोमाणी,व सचिव सौ.अंकिता जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर सचिव अंकिता जैन यांनी अहवाल सादर करून कामकाजाची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कु .चैताली कासार या महाविद्यालयी न विद्यार्थिनीस सौ वैशाली नितीन गुजराती यांच्या सहकार्याने तीन हजार रुपये पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत श्रीमती लाठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. वेले येथील 20 विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी क्लबतर्फे 15 विद्यार्थी व 20 विद्यार्थी नि याना शिक्षणासाठी क्लबने दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण निर्वाहाची जबाबदारी स्वीकारली.
क्लब अंतर्गत उपक्रमात माजी सचिव रुपाली काबरा यांनी संचालित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सदस्यांनी भाग घेतला व त्यांच्या विजेत्याना बक्षिस वाटप करण्यात आली. तसेच मेंबर्स मॅचिंग स्पर्धेच्या विजेत्या मीना पोतदार व रुपाली काबरा यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
हरेश्वर मंदिर परिसरात आमदार सौ .लताताई सोनवणे यांनी वृक्षारोपण करून आमदार निधीतून 5 बेंचेस क्लबच्या फॉरेस्ट निर्माण व प्लेगार्डन साठी देण्याची घोषणा केली. आ . सोनवणे यांचा सत्कार प्रांत चेअरमन मिनल लाठी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. आमदार यांनी यावेळी क्लबच्या विधायक उपक्रमात सहभागी होत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर लाठी यांनी विहीर पुनर्भरण करण्याच्या उपक्रमात सर्व सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी खास उपस्थित डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन सौ अश्विनी गुजराती यांनी ही क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या, व कार्याची माहिती दिली.
क्लबतर्फे खास प्रकाशित अर्धवार्षिक मुखपत्र “सुदर्शन” चे प्रकाशन श्रीमती लाठी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू,क्लब सी सी सौ.किरण पालिवाल, ज्योती वारके,सौ लता छाजेड, उपाध्यक्ष चंचल जैस्वाल, सौ नितु अग्रवाल, सौ नीता विश्वनाथ अग्रवाल, चेतना बडगुजर, सौ सरला राजपूत, सौ उर्मिला राजपुरोहित आदिंनी परिश्रम घेतले.







