जळगाव ( प्रतिनिधी ) – आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी राज्य सरकारकडे मागणी करणारे निवेदन आज जिल्हा पुरोहित मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी 19 एप्रिल रोजी सांगली येथे एका कार्यक्रमात हिंदू धर्माचे विवाह पद्धती बद्दल चुकीचे मंत्र म्हणून पुरोहित वर्गाची टिंगल टवाळकी करत जे अकलेचे तारे तोडले व नंतर राज्याचे मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे हे दोघे खळखळून हसत होते. आमदार मिटकरी यांचे वक्तव्य व अशा मंत्र्यांच्या हसण्याच्या कृतीवरून दोन जातीत तेढ निर्माण होऊन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष भूषण मुळे, सचिव अजय जोशी, पुरूषोत्तम शुक्ल, विजय जोशी, अविकुमार जोशी, दीपक भट, योगेश्वर जोशी, राजाभाऊ जोशी, साखरे गुरुजी, गजानन फळे आदींची उपस्थिती होती.