मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमध्ये गरिबांचे अन्नावाचून हाल होऊ नये यासाठी सलमामने किचन सुरू केले आहे. यावेळी स्वतः तिथे जाऊन सलमान खान याने जेवणाची क्वालिटी चेक केली आणि मग वाटपास सुरुवात केली. यावेळी त्याने तब्ब्ल ५००० फूड पॅकेट गरिबांसाठी वाटले. यापूर्वी सुद्धा सलमान खानने अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केला.

सध्या सलमानचा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी त्याच्या या कामाचे कौतुक केले आहे. करोना विषाणूचा वाढता कहर पाहता राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.







