• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर “अशी’ घ्या काळजी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना काळात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत जवळपास 13 कोटी 1 लाख 19 हजारांहून अधिक लोकांना लस देण्यात आली असून सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत करोना लस घेण्यापूर्वी आणि नंतर कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

करोना लस घेण्यापूर्वी काय करावे?
आपल्याला कोणत्याही औषधाची ऍलर्जी असल्यास, करोना लस घेण्यापूर्वी आपण डॉक्‍टरांना त्याबाबत अवश्‍य सांगावे. लसीकरण करण्यापूर्वी चांगले खाणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच पौष्टिक आहार घ्या आणि भरपूर झोप घ्या. शक्‍य तितका आराम करण्याचा प्रयत्न करा. जर आपण लस घेण्यापूर्वी टेन्शनमध्ये असाल तर कृपया डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.
‘या’ लोकांनी विशेषकाळजी घ्यावी
मधुमेह किंवा रक्‍तदाब असलेल्या लोकांचा आजार नियंत्रित करणे आवश्‍यक आहे. कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांनी आणि विशेषत: केमोथेरपी घेतलेल्यांनी लस घेण्यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना करोनाचा उपचार म्हणून प्लाझ्मा किंवा मोनोक्‍लोनल अँटीबॉडी मिळाली आहेत त्यांनी लस घेण्यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्ला जरूर घ्या. गेल्या दीड महिन्यात ज्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांच्यासाठी, लस घेण्यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे खूप आवश्‍यक आहे.

लसीकरण झाल्यानंतर काय?
लसीकरण केंद्रावर लस लावल्यानंतर लाभार्थ्यास काही गंभीर समस्या आहे का, ते पाहण्यासाठी काही वेळासाठी तेथे बसवले जाते. लाभार्थीस कोणतीही अडचण न आल्यास त्याला तेथून सोडले जाते.

या गोष्टीही लक्षात ठेवा
शरीराच्या ज्या भागावर लस लागू केली आहे त्या भागावर वेदना होणे सामान्य आहे. याची भीती बाळगू नका. या लसीमुळे लाभार्थीस ताप येऊ शकतो. याबद्दलही काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. थंडी वाजून येणे आणि थकवा यासारखे काही दुष्परिणाम देखील काही लोक अनुभवू शकतात. हे सर्व दुष्परिणाम काही दिवसांत नाहीसे होतील.

लस घेतली, त्यानंतर काय करावे?
जर आपण लस घेतली असेल तर असे समजू नका की आपल्याला यापुढे करोनाची लागण होऊ शकत नाही. तज्ज्ञ नेहमीच म्हणत आहेत की ही लस संसर्गापासून नव्हे तर गंभीर आजार होण्यापासून संरक्षण करते. म्हणून, लसीकरणानंतरही करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. यात मास्क घालणे, सहा फुटांचे सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे आणि हात धुणे यांचा समावेश आहे. गरज नसल्यास घराबाहेर अजिबात पडू नका.

लस घेण्यापूर्वी आणि नंतर कोणते अन्न खावे?
जर आपण लस घेणार असाल तर आपले जेवण आणि पेय व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. सकस आणि पौष्टिक आहार घ्या, तळलेले आणि भाजलेले खाऊ नका, तर मुबलक प्रमाणात पाणी प्या. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने खरबूज, काकडी, कलिंगड या पाण्याने समृद्ध गोष्टी खा. या कालावधीत दारू, सिगारेट इत्यादीपासून दूरच राहा. लस घेतल्यानंतरही या गोष्टी लक्षात ठेवा आणि केवळ साधे, पौष्टिक आहार घ्या. करोनापासून बचावासाठी हे आपल्याला खूप मदत करेल.


 

 

Previous Post

रोजा भुकेल्याची भूख-तहानाची जाणीव करून देतो- सुहेल अमीर

Next Post

राजकीय सभा,रोड शो बाबत EC च्या अधिकाऱ्यांना कोर्टाने फटकारले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजकीय सभा,रोड शो बाबत EC च्या अधिकाऱ्यांना कोर्टाने फटकारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon