भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिवपुर कन्हाळा शिवारात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून भुसावळ तालुका पोलीसांच्या पथकाने छापा टाकला. यात हीरू बुध्दू गवळी रा.कन्हाळा हा गावठी दारुच्या भट्टीवर दारू गाळताना व दारू गाळण्याचे गुळ,महू, नवसागर मिश्रीत पक्के,कच्चे रसायनाचे ७ पत्री टाक्यात १ हजार ३०० लिटर ३९ हजार रू. किमतीचे रसायनासह गावठी हात भट्टी ६० लिटर तयार दारू असा एकुण ४७ हजार ९०० रु.किमतीचे ऐवजसह ताब्यात घेतले.या प्रकरणी कलम ३२८,२७०,१८८ सह प्रोव्ही, आपत्ती व्यवस्थापन तसेच साथ रोग अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सपोनि.अमोल पवार,पोहेकॉ.विठ्ठल फुसे,युनूस ईब्राहिम शेख,अजय माळी, पोकाॅ.प्रदीप ईगळे,पोलीस चालक यांनी केली.








