नाशिक (वृत्तसंस्था) – राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

नाशिकमधील करोनास्थितीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. खासगी रुग्णालये कोव्हिडची बिले जास्त आकारतात अशा तक्रारी येत आहेत. त्याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, जे सरकारी ऑडिटर आहेत, या सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. जे बिल हॉस्पिटल देईल ते आधी ऑडिटर्सकडे तपासणीसाठी जाईल.
ऑडिटरने तपासल्यानंतर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जी रुग्णालये ठरली आहेत, त्यातील उपचार मोफत होत आहेत की नाही, हे सगळं ऑडिटर तपासेल. त्यानंतर ते बिल रुग्ण आणि नातेवाईकांना दिले जाईल. रिक्त जागांच्या बाबत मेरिटवर जागा भराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. रिक्त जागांचा प्रश्न ेलवकरच निकाली निघेल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय आहे. नाशिकमध्ये 15 ते 21 ऑगस्टपर्यंत उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्र्यांवर सोपावलेला आहे. नाशिकमध्ये लगेच लॉकडाऊनची गरज नाही. रेमडिसिव्हरच्या सगळ्या ऑर्डर 3 कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. कलेक्टरने हे औषध मागवायला अडचण नाही, असे टोपे यांनी सांगितले.







