भडगाव (प्रतिनिधी ) – कांदा निर्यात बंदी व नुकतेच संमत करण्यात आलेल्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासह विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेतर्फे येथे आंदोलन करण्यात आले.
नुकतीच कांदा निर्यातबंदी केल्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तर संसदेत संमत करण्यात आलेल्या कृषी विधेयकांमुळे बळीराजाची हक्काची शेती ही भांडवलदारांच्या घशात टाकण्याचा डावा रचण्यात आल्याचा आरोप होत असून देशभरात या विरूध्द तीव्र आक्रोश दिसून येत आहे. या अनुषंगाने आज येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा व कृषी विधेयके रद्द करावी अशी मागणी या आंदोलन करण्यात आली. तसेच अतिवृष्टीमुळे भडगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहिर व्हावा अशा आशयाचे मागण्यांचे निवेदन भडगावचे नायब तहसीलदार भालेराव यांना देण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, गणेश परदेशी, मनोहर चौधरी, तालुका प्रमुख डॉ. विलास पाटील, जे.के.पाटील, योगेश गंजे, अनिल पाटील, सीमा पाटील,ईम्रान अली सैय्यद, लखिचंद पाटील,र विंद्र पाटील,निलेश पाटील, विकास पाटील, दिपक पाटील, शशीकांत येवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.