राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मेडियम (सीबीएससी) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका जयश्री पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे सन २०२०-२१ या वर्षाचा राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय गृप व गौरी गृप वावडदाचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सुमित पाटील यांनी सांगितले की शिक्षक आपल्या देशाचे भविष्य घडवीत असतात,आपल्या कार्याची दखल घेऊन ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते.प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने प्रेरित होऊन अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही सन्मानित केल्याने ते त्यांच्यासाठी प्रोत्साहनच ठरते.जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.या उपक्रमांची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केल्याचे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ यांनी यावेळी सांगितले.