जळगाव (प्रतिनिधी) – येथील श्री युवा रक्तदाता सामाजिक संस्थेतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात फळ वाटप करण्यात आली.
या कार्यात अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अमरावती यांचेही सहकार्य लाभले. यावेळी श्री युवा रक्तदाता सामाजिक संस्था अध्यक्ष संकेत ठाकरे, नाना मानकर, प्रज्वल ठाकरे, संदिप कडु, हर्षल गवारे, थँलेसिमिया विभागाचे संजय अढाळे , तसेच अंबाई बहुउद्देशीय सेविभावी संस्था अध्यक्षा माधुरी सचिन चव्हाण, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, सचिव प्रशांत कंकाळे, स्वास्थ्य संजीवन फाउंडेशनचे डाँ प्रदीप तलरेजा यांची प्रमुख उपस्थिति होती.