जळगाव (प्रतिनिधी) – हरीविठ्ठल नगरातील शेतकरी यांच्या घरासमोर लावलेले ट्रक्टरसह ट्रॉली चोरणाऱ्या तीन संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी संदिप सुभाष हटकर (वय-३३) हे शेती करतात. त्यांच्याकडे शेती कामासाठी ट्रक्टर क्रमांक (एमएच १८ झेड ३४३६) जे आजोबाच्या नावे आहे. त्याची आई आजारी असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्या दवाखान्यात होत्या त्यामुळे शेतीचे व ट्रॅक्टरचे काम बंद होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता दवाखान्यातून घरी आले असता त्यांचे १ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ट्रक्टरसह ट्रॉली दिसून आले नाही. त्याच दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी आटोपल्यानंतर ट्रक्टरसह ट्रॉलीचा शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासून बघितले मात्र मिळून आले नाही. ट्रक्टर न मिळाल्याने आज रामांनद नगर पोलीस स्टेशन गाठले. संदिप हटकर यांच्या फिर्यादीवरून रामांनद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी एक पथक तयार करून पथाकात पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर आभोरे, रामकृष्ण पाटील, संजय सपकाळे, अशरफ शेख इंद्रिस पठाण यांनी कारवाई करत चोरीस गेले ट्रक्टर ट्रॉलीसह संशयित आरोपी अरबाज दाऊद पिंजारी (वय-२३), जितेंद्र सुभाष पवार (वय-३६) दोन्ही रा. हरीविठ्ठल नगर आणि ईजाज खान मोहम्मद खान (वय-२६) रा. मालेगाव यांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.