पाचोरा ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र तथा अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा जाती द्वेष भावनेने आताच्या व्यक्तींशी तुलना करुन संपूर्ण मराठा समाजाचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान (महाराष्ट्र) तर्फे निषेध नोंदवत २२ नोव्हेंबर रोजी निषेधार्थ निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी योगेश पाटील, संजय आधार पाटील, सचिन सोमवंशी, धनराज पाटील, दिपक पाटील, प्रमोद पाटील, राजेंद्र ठाकरे, अनिल पाटील, समाधान पाटील, राकेश पाटील, एस. एस. पाटील सह पाचोरा अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.