यवतमाळ (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्हा घाटंजी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची 15 मे 2022 रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.
माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागितली म्हणून सूड भावनेने सदर हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून समोर आले सदर घटना ही धक्कादायक असून महाराष्ट्राच्या प्रगतीत परंपरेला काळीमा फासणारी आहे शासन व प्रशासन भ्रष्टाचारमुक्त लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे जागृक व संवेदनशील नागरिकांचे मनोधर्य खच्ची करणारी ही घटना आहे.
मृत अनिल देवराम ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपींना सहा महिन्याच्या आत कठोरातील कठोर शिक्षा व्हावी व त्यांच्या परिवारास दहा लाख रुपयाची आर्थिक स्वरूपात मदत मिळावी असे लेखी स्वरूपात निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जामनेर जि.जळगाव यांच्या वतीने जामनेर तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.