जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाजवळील द्रौपदी नगरातून मध्यरात्री एकाची ९ हजार रूपये किंमतीची सायकल चोरीस गेल्याचे २४ मार्च रोजी उघडकीला आले. याप्रकरणी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश शरद महाजन (वय-४४) रा. द्रौपदी नगर, रेल्वे उड्डाण पुल, पिंप्राळा हे ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या सुझुकी कंपतीची ९ हजार रूपये किंमतीची सायकल आहे. २३ मार्च ते २४ मार्च दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली सायकल चोरून गेल्याचे सकाळी उघडकीला आले. परिसरात शोधून सायकल न मिळाल्याने योगेश महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. २४ मार्च रोजी रात्री उशीरा महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.





