भडगाव (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस चोरट्यांनी हिम्मत वाढवली असून भडगावात चक्क नायब तहसीलदारांची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील महसूल कॉलनी येथे नायब तहसिलदार राजेंद्र अहिरे राहतात. त्यांच्या मालकिची होन्डा शाईन कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी क्र.एम.एच १९ डि.जे १७७५ हि २३ मार्च रोजी रात्री १२ वाजता त्यांच्या घरासमोरील गेटसमोर लावलेली होती. २४ मार्च रोजी रोजी सकाळी ५ वा.चे सुमारास त्यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही. दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांनी भडगाव पोलिस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.