जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील कुवारखेडा येथे काहीही कारण नसतांना वडील आणि मुलाला चौघांनी शिवीगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी २४ जुलै रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आधार चावदस सपकाळे (वय – ६०) रा. कुवारखेडा, ता.जि.जळगाव हे मुलगा राहूल आधार सपकाळे याच्यासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना भरत लालचंद कोळी, त्याचा भाऊ दिलीप लालचंद कोळी, त्याची आई मंगलाबाई लालचंद कोळी आणि त्याची पत्नी देवकाबाई भरत कोळी यांनी शिवीगाळ केली. यात भरत आणि दिलीप हे दोघे दारू पिऊन आले होते. त्यावेळी दोघांनी हातातील लोखंडी पाईपने आधार सपकाळे यांना मारहाण केली. वडीलांना मारहाण होत असल्याचे पाहून राहूल सपकाळे हा धावून आला. त्याला देखील चौघांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत दोघे जखमी झाले. रविवारी २४ जुलै रोजी सायंकाळी आधार सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भरत लालचंद कोळी, दिलीप लालचंद कोळी,मंगलाबाई लालचंद कोळी आणि देवकाबाई भरत कोळी सर्व रा. कुवारखेडा ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करयात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे.









