जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील एका भागात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका भागात राहणारी १२ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान गावातील राजू नामदेव पवार याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी राजू पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.