जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील भिलपूरा चौकात बेकायदेशीररित्या धारदार चॉपर घेऊन फिरणाऱ्या राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय 26) रा. कांचन नगर जळगाव याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत २४ फेब्रुवारी रोजी रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल पाटील, सहाय्यक फौजदार रवींद्र बोदडे, इंदल जाधव, अनिल कांबळे हे नाकाबंदीसाठी भिलपूरा चौकात गस्तीवर असतांना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुमारास हिस्ट्रीशीटर असलेला गुन्हेगार राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय-२६) रा. कांचन नगर, जळगाव हा बेकायदेशीरीत्या हातात चॉपर फिरत असतांना पकडले. त्याच्या ताब्यातील चॉपर हस्तगत केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल अभिमन पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंखे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल विसपुते करीत आहे.