जामनेर ( प्रतिनिधी ) – धरणगाव येथील सहा वर्षिवर बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन आज दुपारी जामनेरचे नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांना समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की धरणगाव येथील सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या चंदुलाल मराठे यां नराधमास शासनाकडून कठोर शिक्षा करण्यात यावी न्यायालयात जलद गतीने खटला चालवण्यात यावा अशा मागण्या साठी जामनेर तालुका व शहरातील तेली समाजातर्फे जाहीर निषेध करून निवेदन सादर करण्यात आले
या निवेदनावर खान्देश तेली महिला कार्याध्यक्ष वैशाली चौधरी , एन एच पाटील , डॉ . योगिता चौधरी, रामेश्वर पाटील , पप्पू पाटील , सोनल जाधव , माधुरी चौधरी , तेजस चौधरी , अजय चौधरी , निलेश चौधरी यांच्या सह्या आहेत.