जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका हॉस्पिटल समोरून १४ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरली रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला
रामचंद्र देवराम महाजन ( रा. हिवरखेडा बुद्रुक ता. जामनेर ) हे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील पल्स क्रिटी केअर हॉस्पिटल येथे २३ एप्रिल रोजी रात्री नातेवाईकांना भेटण्यासाठी आले. त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ बीएल ५५२७) हॉस्पिटल समोर लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल चोरून नेली. त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु मोटारसायकल कुठे आठळून आली नाही. रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात २४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना अशोक बारी करीत आहेत