जळगाव ( प्रतिनिधी ) – भोइटेनगरातील गौरी हाइट्स अपार्टमेंट मधून २० हजार रूपये किंमतीची टीव्हीएस मोटारसायकल चोरीला गेली . जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशिष किशोर सोनवणे (वय-३८ , रा. गौरी हाईटस् अपार्टमेंट भोईटे नगर ) हे खाजगी नोकरी करतात त्यांच्याकडे टीव्हीएस आपाची आरटीआर १६० मॉडेलची मोटारसायकल आहे. २३ एप्रिल रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू कुठेही मोटारसायकल आढळून आली नाही. २४ एप्रिल रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना योगेश बोरसे करीत आहेत.