• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रत्येक गावांत कोरोना दक्षता समिती नेमण्याचा पालकमंत्र्यांचा मानस

30 खाटांचे आयसीयू बेड व कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत:कडे व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती नेमण्याचा मानस आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे रुग्णालय बनविण्याचा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

येथील वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण व वातानुकुलीत 30 खाटांचे आयसीयू बेडच्या अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राउत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेसह महाविद्यालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका व इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, 30 खाटांचा अतिदक्षता विभाग व प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार माणून कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वजण कोरोना योध्दाची भूमिका बजावत आहात याबद्दलही त्यांनी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद दिले. कोरोनाला हरवायचे असेल तर यापुढील काळात प्रत्येक नागरीकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

कोरोनापूर्वीच्या काळात सामान्य रुग्णालयात 12 व्हेटीलेटर होते. आता याची संख्या 71 इतकी झाली आहे. ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध नव्हते. परंतु आता 311 बेड ऑक्सिजनयुक्त झाले आहे. यात 30 बेड वातानुकुलीत आहेत. गॅस पाईपलाईनद्वारे 311 बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहे याकरीता 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासन तसेच सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून 50 बेड ऑक्सिजयुक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात होताच 7 एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीत जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली. त्यास मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने आठ दिवसात मान्यता दिली. पुढील आठच दिवसात प्रयोगशाळेच्या बांधकामासाठी व बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला व त्यानंतर इतर कामांसाठी 18 लाख रुपये मंजूर केले. याप्रमाणे प्रयोगशाळेसाठी 78 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून खर्च करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेमध्ये पूर्वी 160 नमुने तपासण्यात येत होते. आता एक मशीन वाढविण्यात आल्याने दररोज 300 नमुने तपासण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


 

 

Previous Post

महापौरांच्या सूचनेनुसार चित्रा चौक ते टॉवर चौक मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला

Next Post

स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी राजीनामा द्यावा- सुनील महाजन यांची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी राजीनामा द्यावा- सुनील महाजन यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon