नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कानपूरमध्ये आठ पोलिसांची निर्घृण हत्या करणाऱ्या कुख्यात गॅंगस्टर विकास दुबे याच्या एका साथिदाराला पकडण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. शिवम दुबे असे त्याचे नाव असून हा साथिदार पोलिसांच्या हत्याकांडात सहभागी होता, असे समजते.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीनंतर शिवम दुबे फरार होता. यादरम्यान शिवम नातेवाईकांकडे लपून बसला होता. गुरुवारी संध्याकाळी काही कामानिमित्त तो घराबाहेर पडला असता पोलिसांनी त्याला अटक केली. शिवमच्या चौकशीत अन्य गुन्हेगारांचीही माहिती मिळाणे शक्य होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाताना झालेल्या चकमकीत मारला गेला. विकास दुबेच्या अनेक साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.







