जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगरातील महापालिकेच्या डी.बी.जैन रुग्णालयात प्रसूतिगृह सुरू करण्याची मागणी धर्मरथ फाउंडेशनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे
गरीब महिला शिवाजीनगर येथील डी.बी.जैन मनपा रुग्णालयात प्रसूतीसाठी येतात परंतु कोरोनाच्या आधीपासून तीन वर्षे प्रसूतीगृह बंद होते परंतु कोविड संपल्यानंतर हे प्रसूतिगृह चालू करणार होते असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून मिळाले होते मात्र काहीच कार्यवाही झालेली नाही.शिवाजीनगर व परिसरातील लोकसंख्या बघता महापालिकेचे हे एकमेव रुग्णालय आहे या रुग्णालयात प्रभाग मधूनच नव्हे तर ग्रामीण भागातील महिला देखील प्रसुतीकरता येतात शिवाजीनगर उड्डाणपूल काम चालू असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीस त्रास होत आहे शिवाजी नगरमधून बाहेरील रूग्णालयात महिलांना जाण्यासाठी खूप त्रास होत आहे मनपा प्रशासन म्हणून लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा धर्मरथ फाउंडेशनतर्फे आंदोलन करू.असे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
यावेळी धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, अकील पटेल , राष्ट्रवादी महानगर उपाध्यक्ष, गायत्री सोनवणे, बापू मेने, सागर साळुंखे, संतोष भिताडे आदी उपस्थित होते.