मुंबई (वृत्तसंस्था) – एक जबरदस्त सनसनाटा ‘वाद’ आणि ‘इंडियन आयडॉल १२’ हे आजकाल नवं नवं एकमेकांच्या प्रेमात असणार समीकरण आहे. आजकाल नेहमीच ह्या ना त्या कारणामुळे हा शो रोज फिरून फिरून वादाच्या भोवऱ्यात सापडतो. विशेष म्हणजे शोचं ठीक आहे पण होस्टच काय..? त्याला काय झालय. तोही रोज नव्या मुद्द्यांवरून वादात येऊ लागलाय. आता काय तर.. इंडियन आयडॉल होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ‘राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या’ ? असे म्हटले. मग काय..? नेमके हेच शब्द त्याच्या चांगलेच अंगाशी आले आहेत. मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी त्याच्या वक्तव्याबाबत राग व्यक्त केला आहे.
सोनीच नाही इतर शोमध्येही अनेकदा अलिबागबद्दल असंच काहीही अपमानस्पद कलाकार बोलताना दिसतात. यापुढे अजिबात हे असलं खपवून घेतले जाणार नाही. यापुढे असे काही अपमानास्पद ऐकायला मिळाले तर योग्य ती कारवाई केली जाणार असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.