जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वेच्या परीचालन विभागाची वार्षिक परिषद आज दि. २४ मे रोजी संपन्न झाली. परिषदेत विविध विषयांवर चर्चा होऊन विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
मुंबई मुख्यालयात वरिष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापकांच्या वार्षिक परिषदेला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी संबोधित केले. अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग आणि प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. या परिषदेला मध्य रेल्वेच्या परीचालन विभागाचे कोचिंग विभाग, नियोजन विभाग आणि मालवाहतूक विभागाचे प्रमुख तसेच मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागांचे परीचालन विभाग प्रमुख उपस्थित होते.आगामी वर्ष २०२३-२४ ची उद्दिष्टे आणि उपलब्धी यावर परिषदेत चर्चा करण्यात आली.
मध्य रेल्वे द्वारे २०२१-२२ मध्ये ७६.१६ दशलक्ष टन माल लोडिंग साध्य झाले. वर्ष २०२२-२३ – मध्ये ८१.८८ दशलक्ष टन माल लोडिंग साध्य केले. वर्ष २०२३-२४ – मध्ये ९०.०५ दशलक्ष टन माल लोडिंगचे लक्ष्य निर्धारित केले आहे. एकूण लोडिंगपैकी कोळसा हे सर्वाधिक कमोडिटी लोडिंग आहे. २०२१-२२ मध्ये ३९.५२ मेट्रिक टन लोडिंग पूर्ण झाले.२०२२-२३ – ३७.१७ मेट्रिक टन लोडिंग पूर्ण झाले तर २०२३-२४ मध्ये ४०.९५ मेट्रिक टन कोळसा लोडिंगचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
२०२२-२३ मध्ये ७.४८ मेट्रिक टन सिमेंट लोडिंग साध्य झाले. २०२३-२४ मध्ये ८.८ मेट्रिक टन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिमेंट लोडिंगचे प्रमुख प्लांट्स एसीसी /वाडी/सोलापूर, एसीसी /घुग्गुस/नागपूर, अल्ट्राटेक सिमेंट/होटगी/सोलापूर, ओरिएंट सिमेंट/भादली/भुसावळ हे आहेत. मागील काळात नवीन पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या. भुसावळ-जळगाव २४.१३ किमीची नवीन ३ री आणि चौथी लाईन २०२२-२३ मध्ये पूर्ण झाली. जळगाव-पाचोरा नवीन ४७.५९ किमीची तिसरी लाईन २०२२-२३ मध्ये पूर्ण झाली. नवीन पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहे. यात नागपूर-वर्धा ३री आणि ४ थी लाईन, भुसावळ-खंडवा तिसरी आणि चौथी लाईन, नागपूर-इटारसी, भुसावळ-वर्धा, जळगाव – मनमाड तीसरी लाईन काम सुरु आहे.
भिवंडी, जळगाव, अजनी/नागपूर हे प्रमुख पार्सल लोडिंग पॉइंट म्हणून विकसित केले गेले आहेत. २०२२-२३ – ३१२ पार्सल ट्रेनने ७,६४,७५९ टन माल भरला आणि ४५.८६ कोटी महसूल कमावला. मालाच्या शेडची सुधारणा प्रगतीपथावर असून ते या २०२३-२४ वर्षात पूर्ण होईल. परिभ्रमण क्षेत्र, प्रकाश व्यवस्था, अप्रोच रोड, लेबर रूम, मर्चंट रूम इत्यादींचे नूतनीकरण केले जाईल.
२०२१-२२ – मध्ये ३१७ मालगाड्या दररोज इतर रेल्वे झोनसह मध्य रेल्वे द्वारे ताब्यात घेतल्या व सोपवल्या. २०२२-२३ – मध्ये ३३६ मालगाड्या मध्य रेल्वे द्वारे दररोज बदलतात. हे १८.४ % वाढीव क्षमता हाताळणी आहे. मेल एक्सप्रेस आणि मालगाडीची गतिशीलता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली. रोहा यार्ड, गुरुमार्केट यार्ड, पुणे विभाग, सोलापूर यार्ड, बार्शी यार्ड, सोलापूर यार्ड, बाळे यार्ड,सोलापूर विभाग येथे विद्युतीकरण पूर्ण झाले. ओएचई ओव्हरहेड वायर नवीन सबस्टेशन पूर्ण झाले. कराड/पुणे विभाग, औसा/सोलापूर विभाग, गौडगाव/सोलापूर विभाग, नागोठणे/मुंबई विभाग याठिकाणी काम पूर्ण आहे.