जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातील तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्षय सुर्यंवंशी (वय-२६) हा शिवकॉलनी परिसरात आपल्या परिवारासह राहायला आहे. खासगी कंपनीत आणि मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २३ मे रोजी रात्री १० वाजता जेवण करून झोपला होता. मध्यरात्री त्याने सर्वजण झोपलेले असतांना घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला होता. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे आणि हरीष डोईफोडे करीत आहे. मयताच्या पश्चात आई मालतीबाई आणि मोठा भाऊ ओम असा परिवार आहे.