जळगाव (प्रतिनिधी) – येथील बीएचआर पतसंस्थेचे अवसायक तथा सहायक निबंधक चैतन्यकुमार नासरे यांना राज्य शासनाच्या सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाने तदर्थ स्वरूपात पदोन्नती देण्याचे आदेश काढले आहे. त्यांना आता उपनिबंधक पदावर संधी मिळाली आहे.
शासनाच्या सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाने मंगळवारी काही अधिकाऱ्यांना पदोन्नत्या जाहीर केल्या. त्यात चैतन्यकुमार नासरे यांना सहायक निबंधक पदावरून पदोन्नती देऊन उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका या पदावर पदस्थापना दिली आहे.