पाचोरा (प्रतिनिधी) – येथील समर्थ गोविंद महाराज बिगरशेती सह. पतसंस्थेच्या दि. २३ मे रोजी झालेल्या मासिक बैठकीत संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदासाठी परधाडे येथील अशोक माधव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचा सत्कार पतसंस्थेतर्फे हभप नरहरी रामदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सिताराम पाटील, ज्येष्ठ संचालक डी. एल. पाटील, दामू पाटील, डॉ जयंतराव पाटील, प्रकाश पाटील, मॅनेजर विजय सोनजे, भगवान पाटील, परधाडे वि.का.सोसायटीचे चेअरमन भागवत पाटील यांचेसह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते. या निवडीबद्दल अशोक पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.