जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसीतील लोकमत कार्यालयाच्या मागे मोकळ्या जागेवरील कोरड्या गवताला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले .
एमआयडीसीतील लोकमत कार्यालयाच्या मागे मोकळ्या पटांगणात कोरड्या गवताला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती महापलिकेच्या अग्निशमन विभागाला समजल्यानंतर अग्निशमन बंब रवाना झाला. बंब घटनास्थळी पोहचल्यानंतर काही मिनीटात आग विझविण्यात पथकाला यश आले या आगीत काहीही आर्थीक नुकसान झालेले नाही परंतू पटांगणातील गावतासह झाडेझुडपे जळून खाक झाली आहे. आग विझविण्यासाठी चालक वसंत न्हावी, भगवान पाटील, रविंद्र बोरसे, पुंडलिक सोनवणे आणि नितीन बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रयत्न केले.