पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया येथे आलेल्या ६५ वर्षीय महिलेचे ४१ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालुबाई कैलास पाटील (वय-६५ , रा. पाळसखेडे ता. पारोळा ) कामानिमित्ताने २३ मार्चरोजी पारोळा येथील स्टेट बँक ऑफ इंडीयात आल्या होत्या . त्यावेळी त्यांच्या जवळील ४१ हजाराची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे दुपारी उघडकीला आले रोकड लंपास झाल्याचे लक्षात येताच खळबळ उडाली होती. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापुराव पाटील करीत आहेत.