जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील ज्ञानदेव नगरात पैसे देवाणघेवाणीवरून विवाहितेसह तिच्या आई व मुलाला चौघांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली बुधवारी सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
हर्षदा राहूल टोके ह्या मकरंद कॉलनी महाबळ येथे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. २३ मार्चरोजी हर्षदा टोके त्यांच्या आई कोकीळा काळे ( रा. ज्ञानदेव नगर ) यांच्या घरी आल्या होत्या. राजू झोपे ( रा. विठ्ठल पेठ ) यांना उसनवारीने हर्षदा टोके यांनी ४ लाख ५० हजार रूपये दिले होते. त्यापैकी ३ लाख ३० हजार राजू झोपे यांनी परत केले. उर्वरित १ लाख २० हजार रुपयांची हर्षदा टोके यांनी राजू झोपे कडे मागणी केली होती
बुधवारी सायंकाळी हर्षदा ह्या आईच्या घरी असतांना राजू झोपे, त्याचा भाऊ किरण झोपे, त्याची पत्नी धनश्री झोपे आणि त्याची आई मंगला झोपे हे सर्व विवाहितेच्या घरी आले व शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यात कोकीळा काळे, तिचा मुलगा नैतिक टोके यांनी मध्यस्थी केली असता त्यांना देखील मारहाण केली. राजू झोपे याने विवाहितेवर दगडफेक केली. यात विवाहिता जखमी झाल्या. या विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजू झोपे, धनश्री झोपे, किरण झोपे आणि मंगला झोपे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.