जळगाव ( प्रतिनिधी ) – कंपनीच्या कामानिमित्त गोवा गेलेल्या भुसावळच्या रेल्वे अभियंत्यांच्या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे . तरुण भुसावळचा रहिवासी होता. विवेक सुरेश मुराई असं मयत तरुणाचं नाव आहे. विवेक रेल्वे विभागातील सीनियर इंजिनिअर पदावर होता.
भुसावळहून कंपनीच्या कामा निमित्त गोवा येथे मित्रांसोबत बुलेट बाईकने प्रवास करत गोव्याला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विवेक सुरेश मुराई रेल्वेच्या सिनिअर सेक्शन विभागात इंजिनिअर होता. गोव्याला पोहोचल्यानंतर आईशी फोनवर बोललाही होता.
विचारपूस करून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी समुद्रात उतरला, मात्र समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात शोककळा पसरली आहे.