जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कोळी पेठ येथील पुलाच्या नाल्याजवळ मित्रासोबत झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली आणि नाल्यात लोटून दिले. याप्रकरणी तीन जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर उर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (वय – २४) रा.कोळी पेठ जळगाव हा तरूण हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी २२ जून रोजी सकाळी सागरच्या मित्र याच्यासोबत महेंद्र तुकाराम सोनवणे रा. कोळीपेठ यांच्या वाद झाला होता. या कारणावरून दुपारी २ वाजेच्या सुमारास कोळीपेठेतील नाल्याच्या पुलावर महेंद्र तुकाराम सोनवणे, अण्णा कैलास सैदाणे आणि विशाल उर्फ गेंदा कैलास सैंदाणे सर्व रा. कोळी पेठ यांनी सागर सपकाळे याला गाठत शिवीगाळ करून मारहाण केली. यातील एकाने हातातील लाकडी दांड्याने पायावर मारून दुखापत केली. जखमी अवस्थेत सागरला जवळल्या नाल्यात लोटून दिले व पळून गेले. उपचार घेतल्यानंतर गुरूवार २४ जून रोजी रात्री ९ वाजता सागर सापकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महेंद्र तुकाराम सोनवणे, अण्णा कैलास सैदाणे आणि विशाला उर्फ गेंदा कैलास सैंदाणे सर्व रा. कोळी पेठ यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.