नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – तब्बल एक वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर आता कुठं करोना संसर्ग आटोक्यात आला होता. त्यात लस आल्याने सर्वांच टेन्शन कमी झालं होतं. करोना प्रतिबंधक लसही संपूर्ण देशात देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झालं होतं. मात्र आता करोना रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हात रात्रीच्या संचारबंदीची कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
रात्री अकरानंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून वगळण्यात आले असले तरी त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यामुळे संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना करोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यावरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून करोना निगेटिव्ह रिपोर्ट असल्यावरचं दिल्लीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.