• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राहुल गांधी यांनी ‘या’ प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे लग्न देशात नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधी यांना अनेकदा विरोधकांकडून सोशल मीडियावर लग्न या विषयावरुन ट्रोल करण्यात येत. राहुल गांधी यांची प्रेयसी आहे का यासंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसून खुद्द राहुल गांधींनीही कधी यासंदर्भात उघडपणे खुलासा किंवा वक्तव्य केले नाही. मात्र पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना प्रेयसीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला प्रेयसी आहे की नाही असे राहुल यांना भर कार्यक्रमामध्ये एका मुलीने विचारले आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.

पुद्दुचेरीमधील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले. या कार्यक्रमामध्ये मुलांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले. याचदरम्यान एका मुलीने राहुल यांना, ‘सर’ असं म्हटलं असता त्यांनी, ‘माझं नाव सर नसून राहुल आहे,’ असं म्हटलं आणि त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही तुमच्या मुख्यध्यापकांना सर म्हणा. मला हवं तर तुम्ही राहुल अण्णा (मोठा भाऊ) असं म्हणू शकता,’ असं राहुल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. राहुल यांना सर म्हणणाऱ्या मुलीने आपला प्रश्न पूर्ण करत, ‘तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?,’ असं विचारलं. या मुलीने विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राहुल यांनी या प्रश्नाला हसून उत्तर देताना, ‘या प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या दिवशी देईन,’ असे म्हटले. राहुल यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले.

राजकारण वगळता तुमचे इतरही मित्र आहेत का?, तुम्हाला मैत्रिणी आहेत का?, असतील तर त्या कोणत्या क्षेत्रात काम करतात असा प्रश्नही एका मुलाने राहुल यांना विचारला. ‘माझे अनेक मित्र आहेत. काही राजकारणातील आहेत तर काही बाहेरचे आहेत. काहीजण असे आहेत जे मला त्यांचा राजकीय शत्रू मानतात. मात्र मी त्यांना माझा मित्रच मानतो, ‘ असे उत्तर राहुल यांनी दिले.

एलटीटीईने तुमच्या वडीलांना मारले यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, ‘माझ्या वडीलांची हत्या झाली तेव्हा मला फार दु:ख झालं होतं. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये काहीच द्वेष नाहीय. मी त्यांना माफ केले आहे.’


 

 

Previous Post

यासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिकाची घोषणा

Next Post

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच – शिवसेना नेते संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच - शिवसेना नेते संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026
८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026
८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon