जामनेर ( प्रतिनिधी ) – कुंभारी बुद्रुक येथील कर्जबाजारी शेतकर्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याचे नाव आसाराम रानु जोशी (58) असे आहे.
आसाराम जोशी यांच्यावर बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी तीन दिवसांपासून वसुलीसाठी तगादा लावत असल्याने या सर्व प्रकाराला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असापरीवार आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ सुरवाडे तपास करीत आहे.