जामनेर ( प्रतिनिधी ) – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध करीत जामनेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की , नवाब मलिक नेहमी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल सडेतोड टीका करतात म्हणून सूडबुद्धीने त्यांचे राजकीय व सामाजिक जीवन उद्धवस्त करण्याचे हे कारस्थान आहे . ते मुस्लिम समुदायातील असल्याने त्यांना त्रास देण्यासाठी त्यांचा सम्बन्ध अंडरवर्ल्डशी जोडला जात आहे .