जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील खुबचंद सागरमल विदयालयात साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी साने गुरूजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्याहस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक साळुंखे यांनी साने गुरूजी यांच्या कार्याला उजाळा दिला. सोन गुरूजी यांच्या श्यामची आई या पुस्तकातील काही जीवनावर आधारित काही प्रसंग उपस्थित विद्यार्थ्यांना सांगीतले. तर विद्यार्थ्यांनी साने गुरुजीच्या कथा वाचन केल्या. या प्रसंगी सुरेश आदिवाल, भास्कर कोळी, अजय पाटील, प्रविण पाटील, मयुर पाटील, सुलेमान तडवी हे उपस्थित होते. सुत्रसंचलन सुरेश आदिवाल यांनी तर आभार प्रदर्शन अजय पाटील यांनी केले