चोपडा ( प्रतिनिधी ) – शहरातल्या काजीपूरा परीसरातून गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलीसांनी पकडले. चोपडा ग्रामीण पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काजीपुरा परिसरातून मध्यरात्री अवैधरित्या निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणारा मिनीट्रक (एमएच ४६ ई ५१६२) पोलीसांनी पकडला. चौकशी केली असता या वाहनात १० गुरे असल्याचे उघडकीला आले. पोलीसांनी वाहन जप्त केले असून. पो कॉ राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष प्रकाश चौधरी (वय-३२ , रा. किस्मत नगर, शिरपूर जि.धुळे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे करीत आहेत .