फैजपूर ( प्रतिनिधी ) – अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्यासह मुलगा व त्यांची पुतणी गंभीर जखमी झाल्याची घटना यावल तालुक्यातील हिंगोणागावाजवळ घडली. शनिवारी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप अमृत झांबरे (वय-४२ , रा. चिनावल ता. रावेर ) हे १७ एप्रिल रोजी रात्री पत्नी लतिका झांबरे, मुलगा राज झांबरे आणि पुतणी रिधी झांबरे यांच्यासह (एमएच १९ बीएस १५८८) क्रमांकाच्या वाहनाने हिंगोणा येथून चिनवल येथे जात होते. हिंगोणा गावातील स्मशानभूमीजवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दिलीप झांबरे गंभीर जखमी झाले तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळी योगीता झांबरे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देविदास सुरदास करीत आहेत.