जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाडीवरुन चालकाची दुसऱ्या वार्डात बदली केल्याच्या रागातून त्याने मुकादमला कानशिलात लगावत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
महापालिकेच्या कचऱ्याच्या घंटागाडीवर गणेश सुरेश बाविस्कर ( वय २८ ) हा चालक आहे . दुसऱ्या वार्डात बदली केल्याच्या रागातून गणेश बाविस्कर याने २३ एप्रिल रोजी आंबेडकर नगरात महापालिकेचे मुकादम शेख रफिक शेख मेहमूद ( वय ५५ रा. काट्याफाईल, जळगाव) यांना चापट मारली. व शिवीगाळ करत जीवे मारण्याच धमकी दिली. अशी तक्रार मुकादम शेख रफिक यांनी शनिपेठ पोलिसात दिली असून चालक गणेश बाविस्कर याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. विजय निकम हे करीत आहेत.