पारोळा ( प्रतिनिधी ) – जगातील सर्वात मोठा हस्तलिखित ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामीनारायणांच्या शिक्षापत्रीचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ऑल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाला आहे.
या ग्रंथाचे वजन १२० किलो असून, तो ८ फूट रुंद आणि ५.५ फूट उंच आहे. ज्ञानजीवनदास स्वामी कुंडलधाम (गुजरात) यांच्या प्रेरणेने तयार केलेली ही शिक्षापत्री वडताळघाम येथे १० एप्रिलला समर्पित करण्यात आली.
वडताळघाममध्ये राहून स्वामीनारायणांनी १९६ वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत २१२ श्लोकांची रचना केली. सध्या संस्कृतसह हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमध्ये ही शिक्षापत्री उपलब्ध आहे. ज्ञानजीवनदास स्वामी यांच्या प्रेरणेने ही शिक्षापत्री तयार करण्यात आली आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी स्वामीनारायण यांचे आशीर्वाद आणि आज्ञा पोहोचवण्याच्या उद्देशाने हे ग्रंथ समर्पण पार पडले.
स्वामीनारायण भगवान यांनी १९६ वर्षापूर्वी ही शिक्षापत्री स्वतः वडताळमध्ये राहून लिहिली होती. या चित्ररूपी शिक्षापत्रीमध्ये २१२ २लोक आहेत. २२४ हस्तलिखिते आणि चित्रलेखांचा समावेश या ग्रंथात आढळतो. कुंडलधामच्या १५० हरिभक्तांनी केवळ २४ तासांत हा ग्रंथ तयार केला आहे.