पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा येथील डॉक्टर्स असोसिएशनची तीस वर्षांपूर्वी स्थापना झालेली असून,या संघटनेने समाजहितासाठी चांगले निर्णय घेऊन संघटनावाढीसाठी कामे केली आहेत पाचोरा डॉक्टर असोसिएशनच्या नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली .
यावर्षी नवीन वर्षाची कार्यकारिणी बैठक नुकतीच स्वामी लॉन्स येथे डॉ. अनिल झवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यात नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली आहे
डॉ. दिनेश सोनार यांची नुतन अध्यक्षपदी तर डॉ. सुनील पाटील यांची चेअरमन म्हणून तसेच डॉ. अतुल पाटील यांची उपाध्यक्षपदी , डॉ. नंदकिशोर पिंगळे यांची सचिवपदी आणि डॉ जीवन पाटील यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली व्यासपीठावर डॉ. भरत पाटील, डॉ. नरेश गवंदे , डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. जाकीर देशमुख, डॉ. आलम देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे, डॉ. राहुल काटकर, डॉ. राहुल झेरवाल, डॉ. पवन पाटील , डॉ. आनंद जैन, डॉ राजेंद्र चौधरी, डॉ मुकेश तेली, डॉ हर्षल देव, डॉ कुणाल पाटील, डॉ. संजय जाधव, डॉ. विजय जाधव डॉ सिद्धांत तेली, डॉ प्रवीण माळी, डॉ, दिपक चौधरी, डॉ. राहुल पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ प्रविण देशमुख, डॉ अल्ताफ खान, डॉ विशाल पाटील, डॉ प्रशांत सांगडे, डॉ योगेश इंगळे आदी उपस्थित होते,
यावेळी नुतन अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार यांनी सांगितले की, विविध सामाजिक उपक्रम राबवून शिबिरे भरवणे, डॉक्टरांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असून आपण जीवनदान देणारी व्यक्ती आहे, आपण त्याचा त्यांना फायदा करून देणे, गैरसमजुतीमुळे नातेवाईकांकडुन डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता त्यांना कायदेशीर संरक्षण आणि मार्गदर्शन करून डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवणे व संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .