बोदवड (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून बोदवड येथील व्यापारी संघटना तर्फे ३० बेड (लोखंडी पलंग,गादी,उशी)चे पूर्ण सेट शहरातील अग्रसेन भवन येथे साध्या छोटेखाणी समारंभात आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार हेमंत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी व्यापारी संघटनेची भूमिका मांडली तर उपाध्यक्ष राजेश नानवाणी,अरविंद बरडीया,नंदलाल छाजेड,कैलास जावरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळेस गावात वाढत्या चोऱ्याबद्दल व्यापारी संघटना तर्फे चिंता व्यक्त करण्यात येवून सक्षम अधिकारी देण्याची व व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
तहसीलदार हेमंत पाटील यांनी व्यापारी संघटनेने दिलेल्या भरघोस सहकार्याबद्दल शासनाच्या वतीने आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र (भैय्यासाहेब) पाटील व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. व्यापारी संघटने तर्फे प्रतिसाद दिलेल्या व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.







