• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिहार विधानसभेत MIM आमदाराचा हिंदुस्तान बोलण्यास नकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2020
in भारत
0

 पाटणा (वृत्तसंथा) – 17व्या बिहार विधानसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी अनेक आमदारांनी विधानसभेत प्रवेश करताना सदनाच्या पायऱ्यांवर वंदन केल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाच्या उमेदवारांनी हिंदुस्तान बोलण्यास नकार दिल्यानं जोरदार राडा झाल्याचंही दिसून आलं. MIMचे आमदार भारत बोलण्यावर अडून होते. त्यांना हिंदुस्तान बोलण्यावर आपत्ती होती. MIM आमदाराच्या या व्यवहारावर JDUच्या सदस्यांनीही आक्षेप व्यक्त केला.
MIMचे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथ ग्रहण करताना हिंदुस्तान शब्दावर आक्षेप घेतला. इमान यांना उर्दू भाषेत शपथ घ्यायची होती. मात्र, उर्दूमध्ये भारताच्या जागेवर हिंदुस्तान शब्दाच्या वापराला त्यांनी आक्षेप व्यक्त केला आणि प्रोटेम स्पीकर यांच्याकडे भारत या शब्दाच्या वापराची मागणी केली. त्यावर आपण आपत्ती नाही तर तसा सल्ला देत असल्याचं अख्तरुल इमान म्हणाले.

इमान यांनी हिंदुस्तान शब्दाला आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेत जोरदार राडा सुरु झाला. JDUचे नेते मदन सहनी यांनी आमदारांनी हिंदुस्तान बोललंच पाहिजे असा आग्रह धरला. तर भाजप आमदार नीरज बबलू यांनी हिंदुस्तान बोलण्यास आक्षेप असणाऱ्यांनी पाकिस्तानचा रस्ता धरावा. अशा लोकांना भारतात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशा लोकांनी सभागृह सोडून पाकिस्तानात जावं. हे देश तोडणारे लोक आहेत, अशा शब्दात नीरज बबलू यांनी अख्तरुल इमान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

बिहार विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMने जोरदार प्रदर्शन करत 5 जागांवर विजय मिळवला आहे. सीमांचलमधील कोचाधामन, किशनगंज, अमोर, बहादुरजंग, बैसी, ठाकुरगंज आणि जोकीहाट या विधानसभा मतदारसंघात MIMचे उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

ओवेसी यांच्या MIM पक्षाने सीमांचल प्रांतात मजबूत पकड निर्माण केल्याचं काँग्रेसचे आमदार प्रेमचंद्र मिश्रा यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात महाआघाडीला मोठा फटका बसल्याचंही मिश्रा म्हणाले. ओवेसी यांनी कोणत्या तरी खास कारणामुळे महाआघाडीचा गड असलेल्या सीमांचलमध्ये उमेदवार उभे केल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.

राजदचे प्रवक्ते चित्तरंजन गगन यांनीही ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसींमुळेच महाआघाडीच्या उमेदवारांना फटका बसला. सीमांचलमधील मतांची टक्केवारी पाहिली तर अशी एकही जागा नाही जिथे NDAचा उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी MIM च्या उमेदवाराला जास्त मतं पडली आहेत, असा आरोप गगन यांनी केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने 5 जागा जिंकल्या. या यशामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एमआयएम आगामी काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकाही लढणार असल्याचे संकेत असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारच्या निकालानंतर दिले होते.

‘आम्ही पश्चिम बंगालमधील पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत. आमच्या कित्येक कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसने तुरुंगात डांबले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही ते ठरणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही याआधीही निवडणूक लढवलेली आहे. यानंतरही लढू’ अशी माहिती ओवैसींनी याआधी दिली होती.


 

 

Previous Post

जो बायडन ‘कमजोर अध्यक्ष’, चीनच्या सरकारी सल्लागाराची टीका

Next Post

दिल्लीत खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या तीन टॉवर्सचे मोदींनी केले उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्लीत खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या तीन टॉवर्सचे मोदींनी केले उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार
1xbet russia

स्व.  गोदावरी आई जयंतीनिमित्त आयोजित शिबिरातून चिमकुल्यांना दृष्टी मिळणार

April 2, 2026
गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण- प्राचार्य व्ही.एच. पाटील
जळगाव

स्व.  गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आदरांजली

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

April 2, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिपेक्स टॉक २ के२६ उत्साहात

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon