नवी दिल्ली (वृत्तसंथा) – अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन ‘कमजोर अध्यक्ष’ असल्याची टीका चीनचे सरकारी सल्लागार झेंग योंननियान यांनी केली आहे. अमेरिकेसोबत चीनचे संबंध सुधारतील, अशी अपेक्षा चीननं ठेवून नये, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत सत्ता परिवर्तन झालं असलं तरी त्याचा दोन्ही देशांच्या संबंधावर काही परिणाम होईल असं वाटत नाही, असं देखील झेंग यांनी म्हटलं आहे. जो बायडन यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चीनने कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा झेंग यांनी दिला.
अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आगामी काळात बिघडू शकतात. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत युद्धदेखील होऊ शकतं असं, झेंग योंगनियान म्हणाले. ते अॅडवान्स इन्स्टि्युट ऑफ ग्लोबल अँड कंटेंम्पररी चायना स्टडीज या संस्थेचे ते डीन म्हणून काम पाहतात. ऑगस्ट महिन्यात ते शी जिनपिंग यांना भेटले होते. दिर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी झेंग चीन सरकारची मदत करतात.
झेंग योंगनियान यांनी जो बायडन अमेरिकेतील जनतेच्या भावनांचा फायदा उठवू शकतात, असं मत व्यक्त केलं. अमेरिकेतील समाज दोन गटांमध्ये विभागला केला आहे. त्यामुळे बायडन काही करु शकणार नाहीत, असही झेंग म्हणाले. झेंग यांनी ‘वर्तमानकाळात जो बायडन कमजोर अध्यक्ष आहेत, अमेरिकेचे अंतर्गत मुद्दे ते सोडवू शकणार नाहीत’ असं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या विरोधात असतात असं मानलं तरी ते युद्ध करण्यासाठी तयार झाले नसते, असं झेंग योंगनियान म्हणाले आहेत. मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष युद्ध करु शकतात, असं झेंग यांनी स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले. कोरोना आणि व्यापार, मानवी हक्क यासारख्या मुद्यांवरुन दोन्ही देशांमधील मतभेद वाढत गेले. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीन विरोधी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.







