जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालय व विद्यापीठ प्रशाळांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख आता २७ नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची तारीख १ डिसेंबर अशी राहील. दि.३० नोव्हेंबर पर्यंत महाविद्यालयांनी हे परीक्षा अर्ज ऑनलाईन पध्दतीने इनवर्ड करावेत. महाविद्यालयांनी विलंब शुल्क विरहित व विलंब शुल्कासहचे परीक्षा अर्ज विद्यापीठ कार्यालयात ३ डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.







